दक्षिण मुंबईत लागणार १,२५० सीसीटीव्ही कॅमेरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दक्षिण मुंबईत लागणार १,२५० सीसीटीव्ही कॅमेरे

Share This
मुंबई : मुंबई शहराची सुरक्षा भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रणाला मदत करणे, यासाठी अतिमहत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी साडे अकरा वाजता ताजमहल हॉटेल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण शहरात जागतिक दजार्चे व उच्च क्षमता असलेले सुमारे ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळी दरम्यानच्या संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या प्रकल्पात ३ नियंत्रण कक्ष असतील. वाहनांच्या नंबर प्लेट डिटेक्शन, व्हिडीओ अ‍ॅनालिटिक्स, तसेच एक हजार पोलीस वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. अपर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुढच्यावर्षी एप्रिलपर्यंत तर तिसऱ्या व अंतिम टप्प्याचे काम आॅक्टोबर २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे. हे काम एल अ‍ॅन्ड टी कंपनी मार्फत करण्यात येत आहे, तसेच या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार ‘मेसर्स प्राइस वॉटर हाऊस कुपर्स’ हे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages