कोस्टल रोड बनवण्याचे ज्ञान नाही,अशाच कंपनीला काम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोस्टल रोड बनवण्याचे ज्ञान नाही,अशाच कंपनीला काम

Share This

मुंबई - मुंबई किनारा रस्ता प्रकल्पासाठी (कोस्टल रोड) मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागाराला कोस्टल रोडच्या कामांचे ज्ञान नसल्याचे आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. मॉरिशसमध्ये कोस्टल रोडचे काम करण्याचा अनुभव असल्यामुळेच विस्तृत प्रकल्प अहवाल व निविदा तयार करण्यासाठी फ्रिश्मन प्रभू इंडिया (प्रा) लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाने केला. परंतु मॉरिशसनमध्ये कुठेही कोस्टल रोड नाही, त्यामुळे ज्या कंपनीला कोस्टल रोड बनवण्याचे ज्ञान नाही,अशाच कंपनीला हे काम दिल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.

नरिमन पॉईंट ते मालाड मार्वे रोड असा मुंबई किनारा रस्ता प्रकल्प महापालिकेकडून राबण्यात येत आहे. सुमारे १२ हजार कोटींच्या या रस्ता प्रकल्प किचकट व गुंतागुंतीचा तसेच यासाठी होणारा खर्च अधिक असल्याने या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेत मे. फ्रिश्मन प्रभु इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी आला असता, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय कंपनीची निवड करण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांत जाहिरात का देण्यात आली नाही. राष्ट्रीय स्तरावरीलच वृत्तपत्रात जाहिरात का दिली,अशी शंका उपस्थित करत या कंपनीला ३३.५ किलो मीटर लांबीचा रस्ता बनवण्याचा अनुभव आहे का सवाल केला. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही आक्षेप घेत भुयारी मार्ग वगळण्यात आले तर हे सल्लागार कोणत्या विस्तृत प्रकल्प अहवालावर काम करणार आहेत, याची विचारणा केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages