पोलिसांनी घेतली अवयवदानाची शपथ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलिसांनी घेतली अवयवदानाची शपथ

Share This
मुंबई - राष्ट्रीय अवयवदानानिमित्त पालिकेच्या वतीने पोलिसांकरिता आयोजित एका विशेष कार्यशाळेत मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (ता. 27) अवयवदानाची शपथ घेतली. आझाद मैदानातील प्रेरणा हॉलमध्ये कार्यशाळा झाली. 

समाजात अवयवदानाबाबत गैरसमज आहेत. त्यामुळेच अनेकांना अवयव मिळत नाहीत. भारतात लाखो रुग्णांचा अवयव न मिळाल्याने मृत्यू होतो. याबाबत समाजात जागृतीसाठी झेडटीसीसी आणि पालिकेच्या वतीने मुंबई पोलिसांकरिता कार्यशाळा घेण्यात आली. याला पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवयवदानाबाबत पोलिसांना फारशी माहिती नसते. मृत व्यक्तीचा पंचनामा करण्यापासून ते शवविच्छेदनाकरिता परवानगी आदीची प्रक्रिया फार किचकट असते. याचा फटका अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना होतो. अवयवदान नेमके कसे होते, त्याचे नेमके कायदे काय, अवयव कसे नेले जातात, त्यासाठी वाहतूक पोलिसांनी काय करावे आदींचे मार्गदर्शन केईएम रुग्णालयाच्या डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. सुजाता पटवर्धन यांनी या वेळी केले. उपस्थित पोलिसांनी कार्यक्रमानंतर अवयवदानाचे डोनर कार्ड भरून शपथ घेतली. दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक संतोष जाधव यांनी अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी अधिकारी म्हणून काम करू, अशी इच्छा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages