बेकायदा हाेर्डिंग्ज लावल्यास कोर्टाच्या अवमानाची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेकायदा हाेर्डिंग्ज लावल्यास कोर्टाच्या अवमानाची कारवाई

Share This

मुंबई - न्यायालयाने मनाई अादेश देऊनही अनेक शहरांमध्ये विनापरवाना हाेर्डिंग्ज, पाेस्टर्स सर्रास लावले जात अाहेत. अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच फटकारले. ‘यापुढे राज्यात कुठेही बेकायदा हाेर्डिंग्ज लावल्याचे निदर्शनास अाल्यास न्यायालयाच्या अादेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल,’ अशा शब्दात न्यायालयाने सुनावले. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाला बेकायदा हाेर्डिंग्ज लावणार नसल्याचे लेखी हमी यापूर्वीच दिलेली अाहे.
शासनाचे सर्व नियम व काेर्टाचे अादेश धाब्यावर बसवून बेकायदा हाेर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दाखल दाेन जनहित याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्ती अभय अाेक व न्यायमूर्ती गाैतम पटेल म्हणाले, ‘न्यायालयाकडे दिलेल्या लेखी हमीचे राजकीय पक्षांकडून उल्लंघन हाेत असल्याचे निदर्शनास येत अाहे, ही अत्यंत वेदनादायी गाेष्ट अाहे. हे प्रकार थांबले नाहीत तर अशा राजकीय पक्षांविराेधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईचे अादेश २० नाेव्हेंबरला काढले जातील.

मागील सुनावणीच्या वेळी बेकायदा हाेर्डिंग्ज न लावल्याबाबत राजकीय पक्षांनी दिलेल्या हमीचे पालन हाेते की नाही हे पाहण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने संबंधित शहरात अायुक्तांकडे साेपवली हाेती. त्यांच्या अहवालानुसार, सर्वच राजकीय पक्ष त्याचे उल्लंघन करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास अाले अाहे. त्यामुळे अाता संबंधित राजकीय पक्ष व त्यांना राेखण्यास अपयशी ठरलेल्या महापालिका प्रशासनाला अवमानना नाेटीस बजावण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages