डॉ बाबासाहेब अम्बेडकरांना संविधान सभेत निवडून देणाऱ्या बंगालच्या दलितांचा आम्हाला अभिमान--रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ बाबासाहेब अम्बेडकरांना संविधान सभेत निवडून देणाऱ्या बंगालच्या दलितांचा आम्हाला अभिमान--रामदास आठवले

Share This
ढाका दि 19--महामानव डॉ बाबासाहेब आम्बेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून जगात गौरविले जात आहे संविधानातून डॉ बाबासाहेबांनी दलित आदिवासी ओबीसी सर्व वंचित घटकांसाठी मानवी अधिकाराच्या तरतुदी करून नवी संजीवनी दिली भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सर्व जग डॉ बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे नतमस्तक होत आहे मात्र त्याच डॉ अम्बेडकरांना संविधान सभेच्या पहिल्या निवडणुकीत निवडून येवु नये म्हणून कॉंग्रेसने व्यूहरचना केली होती असा इतिहास आहे मात्र बंगालच्या बहाद्दर नामशूद्र दलितांनी जोगेन्द्रनाथ मंडलांच्या नेतृत्वात् प्रचंड लढ़ा देवून डॉ अम्बेडकरांना संविधान सभेत निवडून देण्यास तत्कालीन आमदारांना भाग पाडले होते याबद्दल आम्हाला बंगालच्या दलितांचा अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी ढाका येथे केले

विलसन विभाग येथील वाशिंगटन हॉटेल येथे दलित एशियन पार्लमेंटरी फोरम ची दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे त्यात मार्गदर्शन करताना खासदार आठवले बोलत होते या परिषदेत भारत बांग्लादेश आणि नेपाळचे लोकप्रतिनिधि उपस्थित आहेत डॉ बाबासाहेब अम्बेडकरानी उभारलेला मानवमुक्तीचा लढ़ा जगभरातील मानवधिकारासाठी लढणाऱ्या चळवळींना आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरला आहे दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी नेपाळ बांग्लादेश आणि भारतातील दलित लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचे खासदार रामदास आठवले म्हणाले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages