महापालिकेत ‘संविधान दिवस’ साजरा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेत ‘संविधान दिवस’ साजरा

Share This

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष हे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करावयाचे असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिका मुख्यालयात आज (दिनांक २६ नोव्हेंबर, २०१५) संविधान दिवस कार्यक्रमातसंविधानाची प्रास्ताविका/ उद्देशिका चे समूह वाचन करण्यात आले.


दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ पासून भारतीय संविधान अंमलात आले. या दिनाचे औचित्य साधून शासनाने दिनांक २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिवसम्हणून जाहीर केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयातील महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात आज (दिनांक २६ नोव्हेंबर, २०१५) सकाळी भारतीय संविधान प्रास्ताविका चे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, उप आयुक्त (करनिर्धारण व कर संकलन) मिलिन सावंत, उप आयुक्त (सामान्य प्रशासन)  सुधीर नाईक, उप आयुक्त (मध्यवर्ती भरती प्राधिकरण) सुनील धामणे, उप आयुक्त (विशेष अभियात्रिकी) रमेश बांबळे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर, प्रमुख लेखापाल (वित्त) हरिभाऊ निकम, कायदा अधिकारी उज्जवला देशपांडे, प्रमुख चौकशी अधिकारी रमेश दणाणे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांत तसेच आस्थापनांमध्येही संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

Displaying BMC_3897.JPG

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages