मुंबई / प्रतिनिधी - रेल्वेच्या उपनगरीय प्रवासासाठी द्वितीय श्रेणीच्या तिकीट दरात २२ नोव्हेंबर २०१५ पासून बदल करण्यात आला आहे. रेल्वेचे कमीत कमी ५ रुपये भाडे असलेली तिकिटे रद्द करण्यात आली असून त्या ऐवजी १० रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे. नव्या १० रुपये दाराची तिकिटे वितरीत केली जाणार आहेत. रेल्वेच्या उपनगरी तिकिटामध्ये वाढ करण्यात आली असली तरी उपनगरीय पासच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
केंद्रात भाजपा सरकार सत्तेत येताच लांबच्या पासच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सरकारने कमी अंतराच्या प्रवासाचे दर वाढवणार नाही असे जाहीर केले होते. परंतू वर्षभरातच सरकारने आता कमी अंतराच्या तिकीट दरांत दुप्पट वाढ केली आहे. एकीकडे देशातील नागरिक महागाईने त्रस्त असताना रेल्वे प्रवाश्यांना आणखी महागाईत टाकण्याचे काम सरकार आणि रेल्वे विभागाने केले आहे. अच्छे दिन आणे वाले है ची स्वपन दाखवत सत्तेवर आलेले सरकार महागाई कमी न करता महागाई सतत वाढवत असल्याने हेच का अच्छे दिन असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे

No comments:
Post a Comment