बाळासाहेबांनी राज्यासाठी केलेले कार्य स्मारकाच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम सरकार आणि ट्रस्टच्या माध्यमातून केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्मारक केव्हा पूर्ण होणार याचा कालावधी अद्याप ठरलेला नाही, मात्र आमच्या कार्यकाळात १०० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. युतीतील वादावर फडणवीस यांनी भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आज नाहीत, पण दोन पक्षातील वाद त्यांनी कशा प्रकारे सोडवले असते हे आम्हाला माहित आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ट्रस्टचे अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे असणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक तयार करू, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जागा सर्वच चांगल्या आहेत, पण शिवाजी पार्कचे महत्त्व वेगळे आहे, शिवाजी पार्क ही सेनेची कर्मभूमी, महापौर बंगल्याचे शिवसेनेला आशीर्वाद आहेत. मुख्यमंत्र्यांनी तमाम हिंदूंच्या भावनांचा आदर करत स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिली, यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

No comments:
Post a Comment