नवदाम्पत्याला शिवीगाळ करणाऱ्या ३५ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नवदाम्पत्याला शिवीगाळ करणाऱ्या ३५ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Share This








मिळालेल्या माहिती नुसार नवदाम्पत्य दिवाळीनिमित्त लाखनी येथील कमलाबाई यादोराव गणवीर यांच्या घरी आले होते. त्यांचा भाचा आनंद तिरपुडे याने १९ ऑक्टोबर २०१५ रोजी लाखनी येथील एका युवतीशी विवाह केला. विवाहबद्ध झालेली ही जोडपी १० नोव्हेंबर रोजी कमलाबाई गणवीर यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. ही बाब मुलींकडील मंडळींना माहित होताच त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी कमलाबाई गणवीर यांच्या घरी येवून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता लाखनी पोलिसांनी त्या ३५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे. पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होवून चार दिवस लोटले असले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या प्रकरणाची चर्चा केली जात असून पोलिस आरोपींना पाठीशी घालतात कि काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.   
   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages