आरोग्य िवद्यापीठास गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे - आमदार रामनाथ मोते - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरोग्य िवद्यापीठास गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे - आमदार रामनाथ मोते

Share This
मुंबई / प्रतिनिधी - नािशक येथे असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आिण मराठवाड्याचे सुपूत्र लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी िशक्षक आमदार रामनाथ मोते यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली आहे. 

लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांचे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सामाजिक काम विचारात घेऊन त्यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे, यासाठी १२ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवसाचे औचीत्य साधून शासनाने महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठास "लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे आरोग्य विज्ञान विद्यापीठ" असे नामकरण करण्याबाबतची घोषणा करावी अशी मागणी आमदार मोते यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.


शासनाकडे आलेल्या मागणी प्रस्तावानुसार सदरचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०१५ च्या पत्रान्वये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ ऑक्टोबर २०१५ च्या अधिसभेच्या बैठकीत कुलसचिव यांच्या उपस्थितीत हा विषय चर्चेला आला होता. अधिसभेने "सदर विषय हा शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे शासन जो निर्णय घेईल त्यास सभागृहाची मान्यता असेलह्ण असे सांगून ठराव सर्व संमतीने मंजूर केला असून शासनाने निर्णय घ्यावा असे सुचित केल्याचे मोते यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या अधिसभेची कोणतीही हरकत नसल्याने शासनाने तातडीने हा निर्णय घ्यायला हवा. शासनाच्या आिण आरोग्य िवद्यापीठाच्या िवचाराधीन हा प्रस्ताव आहेच, मुंडे यांच्या नावाला त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे कोणी िवरोध करण्याचा प्रश्नच नाही. पुढच्या महिन्यात मुंडे यांची जयंती आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण आज मुख्यमंत्री आिण िशक्षणंमत्री यांना भेटून मागणी केल्याचे आमदार रामनाथ मोते यांनी ह्यिदव्य मराठीह्णला सांगितले. राज्यातील वैद्यकीय िशक्षणात सुसूत्रता यावी, भावी डॉक्टरांना अत्याधुनिक प्रकारचे प्रशिक्षण िमळावे यासाठी १९९८ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून नािशक मध्ये या आरोग्य िवद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages