दहिसर (पूर्व) येथील ‘जरीमरी उद्यान’ आणि दहिसर (पश्चिम) येथील ‘साने गुरुजी उद्यान’ चे रविवारी लोकार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहिसर (पूर्व) येथील ‘जरीमरी उद्यान’ आणि दहिसर (पश्चिम) येथील ‘साने गुरुजी उद्यान’ चे रविवारी लोकार्पण

Share This

मुंबई ( प्रतिनिधी ) - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दहिसर (पूर्व) येथील जरीमरी उद्यान आणि दहिसर (पश्चिम) येथील साने गुरुजी उद्यानाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ नोव्हेंबर, रोजी  सायंकाळी ७ आणि ७.३० वाजता जरीमरी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, दहिसर (पूर्व),आणि साने गुरुजी उद्यान, सखाराम तरे महापालिका शाळेजवळ,रंगनाथ केसकर मार्ग, दहिसर (पश्चिम), येथे आयोजित करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून उप महापौर अलका केरकर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तर सन्माननीय अतिथी म्हणून सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, विविध पक्षांचे गटनेते, वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार भाई जगताप, ‘आर/मध्य व आर/उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा हंसाबेन देसाई, स्थानिक नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे, महापालिका सदस्य तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, सह आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) (उद्याने)  शांताराम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages