राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करा

Share This

मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत प्रगणक प्रत्येक घरास प्रत्यक्ष भेट देणार असून सर्व मुंबईकरांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती उपलब्ध ठेवावी आणि सदर माहिती प्रगणकास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचा तसेच ज्या व्यक्ती बहुतकरुन स्थानिक निबंधकाच्या अधिकार क्षेत्रात राहात आहेत, अशा सर्व व्यक्तींच्या संबंधातील माहिती संकलीत करण्याकरीता सर्व स्थानिक रहिवाशांच्या घरोघरी जाऊन प्रगणना करण्याचे क्षेत्रीय काम दि. १० ऑक्टोबर, २०१५ पासून सुरु करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आले आहे. याबाबत प्रगणक प्रत्येक घरास प्रत्यक्ष भेट देणार आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड आणि शिधावाटप पत्रिकेबाबतची माहिती हे प्रगणक घेणार आहेत.

तसेच ज्या व्यक्ती हयात नाहीत किंवा स्थलांतरीत झाल्या आहेत तसेच जे नवीन सदस्य कुटुंबात आले आहेत किंवा नवीन कुटुंब रहावयास आले आहेत, अशांचीही नोंद होणार आहे. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती उपलब्ध ठेवावी आणि सदर माहिती प्रगणकास देऊन मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करुन सदर मोहीम यशस्वी होण्यास मदत करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.                                                 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages