मुस्लिम समाजाला आरक्षणाकरिता जन आंदोलन करणार - मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुस्लिम समाजाला आरक्षणाकरिता जन आंदोलन करणार - मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती

Share This
मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) - वर्तमान काळात मुस्लिम समाज पूर्णतः पिछडलेला समाज आहे. असा अहवाल जस्टिस सच्चर साहेब, रंगनाथ मिश्र यांनी आपल्या अहवालात तर मांडलेच परंतु डॉ. मेहमूद उर रहेमान यांनी सुध्दा मुस्लिम समाजाची अवस्था शासना समोर ठेवली व मुस्लिम समाजाला १० % आरक्षणाची गरज आहे असा अहवाल शासन दरबारी सादर केला.

कोर्टाचा आदेश असुन सुद्धा सत्ता धारी पक्षांनी राज्य सभेत ठराव पारित केले नाही. याला दुर्दैवच म्हणावा लागणार. करीता येत्या हिवाळी अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज नागपुर इथे एकत्रीत येऊन आपल्या हक्काची म्हणजेच आरक्षणाची मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आव्हान करण्यात आले की, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती च्या माध्यमातून मुस्लिम आरक्षण लागु करण्याकरिता हिवाळी अधिवेशनात एकत्रीत येऊन आपल्या हक्काची मागणी करावी. याकरिता काल यवतमाळ येथे सभा ठेवण्यात आली. सभेत, विदर्भ अध्यक्ष अॅड.आसिफ कुरैशी, अॅड जावेद शेख, महाराष्ट्र सदस्य आसिफ रजासाहेब, विदर्भ सदस्य मो जाकीर मेहबूब शेख, सदस्य आबीद अली, तारीख लोखंडवाला सा. वजाहत मिर्झा रा, आरिफ बेग शा सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लिम आरक्षणा संबंधी होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

येत्या नागपुर हिवाळी अधिवेशनादरम्यान १० % मुस्लिम आरक्षणाच्या मागणी करिता १६ डिसेंबर रोजी संपूर्ण महारष्ट्रातील मुस्लिम समुदायातील संघटनांच्या वतीने नागपुर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या यवतमाळ च्या जिल्ह्याध्यक्ष पदी मो तारीक साहीर लोखंडवाला यांची नियुक्ती करण्यात आली असुन महाराष्ट्रातून मुस्लिम समुदायाने हिवाळी अधिवेशन दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages