रहिवाशांना गंडा घालणारा विकासक गजाआड, आरएके पोलिसांची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रहिवाशांना गंडा घालणारा विकासक गजाआड, आरएके पोलिसांची कारवाई

Share This
मुंबई: एसआरए अंतर्गत बांदण्यात येनारया इमारतीमधील रुम विकण्याच्या बहाण्याने रहिवाशांना १० कोटींचा गंडा घालणारया विकासकाल आरएके मार्ग पोलिसांन अटक केली. यामध्ये त्याच्या मुलाचा देखील समावेश असून पोलीस त्याचा देखील शोध घेत आहे.

वडाळ्यातील रफि अहमद किडवाई मार्गावर गेल्या १५ वर्षांपासून फिरोज टिनवाला आणि त्याचा मुलगा मुस्तफा टिनवाला हे एसआरए प्रकल्प राबवर आहेत. १०१२मध्ये याठिकाणी या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले होते. त्यानंतर या विकासकांनी झोपडीधारकांना पहिला आणि दुसरया मजल्यावरील घरे देण्याचे ठरवले. तर ३ रा आणि ४था मजलायावरील घरे त्यांनी विक्रीसाठी ठेवली होती. २२५ स्केअर फिटाचे रुम वडाळा परिसरात ३० लाखात मिळत असल्याने ३१ जणांंनी याठिकाणी पैसे भरले. त्यानुसार येत्या चार महिन्यात पजेशन देण्यात येईल असे अश्वासन विकासकाने या लोकांना दिले. त्यानंतर सहा महिने उलटून गेल्यानंतर देखील त्याने पुढील कामाल सुरुवात केली नाही. ३१ जणांना या विकासकाला ८ ते १० कोटी रुपये दिले होते. त्यामुळे हे रहिवाशी प्रत्येकी दोन दिवसांनी त्याच्या कार्यालयात जात होते. मात्र या रहिवाशांना नेहमीच काहीतरी कारणे देउन तो त्यांना टाळक होता. त्यानंतर चार वर्ष उलटल्यानंतर देखील विकासकाने राहिलेले काम पूर्ण केले नाही. शिवाय घरांचे रजिस्टेशन देखील करुन दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे या रहिवाशांना समजताच त्यांना याबाबत दोन महिन्यांपूर्वी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
   
विकासकाला ही बाब समजाताच गेल्या दोन महिन्यांपासून तो फरार होता. बुधवारी रात्री तो त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यााला अटक केली आहे. तर त्याच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहेत. ज्या रहिवाशांना घरासाठी या विकासकाला पैसे दिले आहेत. या सर्वांनी व्याजाने तर कोणी नातेवाईकांकडून पैसे काढले आहेत. त्यामुळे शासनाने या विकासकावर कडक कारवाई करत आम्हाला आमची घरे मिळवून द्यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages