महापारीनिर्वानदिनी शिवाजी पार्कवर राजकारण्यांना थारा नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2015

महापारीनिर्वानदिनी शिवाजी पार्कवर राजकारण्यांना थारा नाही

मुंबई / अजेयकुमार जाधव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापारीनिर्वान दिनी लाखो भीम अनुयायी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात येतात. या लाखो भीमअनुयाया पुढ्यात राजकीय पक्ष सभा आयोजित करून आपल्या पोळ्या भाजत असतात. वर्षानुवर्षे असे प्रकार सुरु असले तरी यावर्षापासून अश्या प्रकारावर रोक लावली जाणार आहे. दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने असे पत्र पालिकेला दिले असून कोणत्याही राजकीय पक्षांच्या सभांसाठी स्टेज बांधायला परवानगी देवू नये असे या पत्रात म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनी शिवाजी पार्क मैदानावर वर्षानुवर्षे आंबेडकरी विचारांच्या पक्षांच्या सभा आयॊजित केल्या जातात.  यामध्ये रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, यांच्यासह इतर नेत्यांच्या सभा वर्षानुवर्षे शिवाजी पार्क परिसरात होत आल्या आहेत. अश्या राजकीय पक्षाच्या सभा सन २०१४ पर्यंत होत आल्या आहेत. परंतू सन २०१४ मध्ये महापरीनिर्वान दिनी राजकीय सभां सुरु असताना गालबोट लागले आहे.  श्यामदादा गायकवाड यांच्या सभेमधील वक्त्यांनी रामदास आठवले यांच्यावर टिका टिप्पणी केली. हि टिका सहन न झाल्याने रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी श्यामदादा गायकवाड यांच्या स्टेजवर जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. 

महापरिनिर्वान दिनी गटामध्ये झालेल्या मारहाणीवेळी झालेल्या पळापळीमध्ये जमलेल्या लाखो लोकांना याची झळ पोहचली असती. शेकडो लोक जखमी झाले असते. याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. दोन गटात झालेल्या मारहाणीमुळे मुंबई पोलिसांच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने यापुढे महापरिनिर्वानदिनी कोणत्याही राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभेला परवानगी देवू नये अशी भूमिका घेतली आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने तसे पत्रच मुंबई महानगरपालिकेला दिले असून मुंबई महानगरपालिकेनेही राजकीय पक्षांच्या सभांना स्टेज बांधण्यास परवानगी देवू नये असे म्हटले आहे. मुंबई पोलिस आणि मुंबई महानगरपालिका यावेळी राजकीय पक्षांच्या सभांना परवानगी देणार नसल्याने यावर्षापासून शिवाजी पार्कवर आंबेडकरी विचारांच्या पक्षांना सभा घेता येणार नाहीत. मुंबई पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचे आंबेडकरी जनतेच्या वतीने स्वागत केले जात असून महापरिनिर्वाणदिनी राजकारण करणाऱ्यांना चाप लावल्याने आभार मानले जात आहेत.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad