जप्त केलेला 15 हजार टन कडधान्याचा साठा मुक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जप्त केलेला 15 हजार टन कडधान्याचा साठा मुक्त

Share This
मुंबई : मर्यादेपेक्षा जास्त कडधान्याचा साठा असलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या साठ्यापैकी 15 हजार 147 मेट्रीक टन साठा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मुक्त करण्यात आला आहे.

बाजारपेठेत तुरडाळींची उपलब्धता व्हावी, यासाठी 24 नोव्हेंबर 2015 रोजी मंत्रिमंडळाने तूर आणि तूरडाळी व्यापाऱ्यांना इंडेम्निटी बॉण्डवर परत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.

आज दि. 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरात 1 हजार 357.56 मेट्रीक टन कडधान्याचा साठा मुक्त करण्यात आला आहे. त्‍यात 972 मेट्रीक टन तुरीचा साठा, तसेच 385.56 मेट्रीक टन इतर डाळींचा समावेश आहे. ही कार्यवाही सुरू झाल्यापासून आजपर्यंत 15 हजार 146.96 मेट्रीक टन कडधान्याचा साठा मुक्त करण्यात आला आहे. यात 7 हजार 803 मेट्रीक टन तुरीचा साठा तसेच 7 हजार 343.96 मेट्रीक टन इतर डाळींचा साठा मुक्त करण्यात आला आहे.

बाजारपेठेत तूरडाळींची उपलब्धता आणि त्याचे दर नियंत्रित राहावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर तूर आणि इतर डाळी मुक्त करण्याचे काम गतीने करण्यात येत आहे. शासकीय सुटी असूनही गेल्या शनिवारी आणि रविवारी ही कार्यवाही करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages