पश्‍चिम रेल्वेवर 25 लाखांचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्‍चिम रेल्वेवर 25 लाखांचा दंड वसूल

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 14 डिसेंबर – 
रेल्वे अपघातांचे वाढते प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत 6 हजार 398 जणांवर कारवाई करण्यात आली. 25 लाख 19 हजारांचा दंड वसूल केल्याचे पश्‍चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले. लोकल अपघातांतील प्रवाशांचा मृत्यूचा आकडा वाढत आहे. भावेश नकाते याच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. आरपीएफने नुकतीच तीन दिवसांची विशेष मोहीम राबवली. त्यात तब्बल 25 लाखांचा दंड प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांकडून जास्त दंड मिळाला, असे झा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages