नालेसफाईच्या कामांची चौकशी - ३२ कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आयुक्तांचे निर्देश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईच्या कामांची चौकशी - ३२ कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आयुक्तांचे निर्देश

Share This

मुंबई- महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाईच्या कामांची चौकशी करून ३ कंत्राटदारांविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. आता उर्वरित कंत्राटदारांची चौकशीही पूर्ण झाली असून त्याचा अहवाल बुधवारी आयुक्तांना सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यात पूर्वीच्या तीन कंत्राटदारांप्रमाणेच इतर सर्वच ३२ कंत्राट कामांमधील कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

नालेसफाईच्या कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीत उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या समितीने या कामांवर संशय व्यक्त केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची चौकशी समिती नियुक्त केली. तिने तीन कंत्राट कंपन्यांच्या विरोधात एफआयआर तसेच १४ अधिका-यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. त्यानुसार आर. ई. इन्फ्रा, नरेश ट्रेडर्स, आकाश इंजिनीसअरिंग या तीन कंत्राटदारांसह व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, वजन काटा कंपनी आदींविरोधात गुन्हा दाखल केला.
मात्र, पहिल्या टप्प्यात ९ कंत्राट कामांची चौकशी करून ३ कंत्राटदारांविरोधात कारवाई केल्यानंतर उर्वरित कंत्राट कामांची चौकशी हाती घेण्यात आली होती. या सर्वाची चौकशी पूर्ण झाली आहे. या अंतिम अहवालात ३२ कंत्राट कामांमधील कंत्राटदारांविरोधात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा (एफआयआर) दाखल करण्याची शिफारस केली असल्याचे समजते.
देशमुख समितीने प्रथम ९ कंत्राट कामांचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. परंतु त्यानंतर पहिल्या ९ कामांसह उर्वरित कामांचीही चौकशी करण्यात आली आहे. ज्यात मोठयाप्रमाणात अनियमितता दिसून आली आहे. या अहवालात, नालेसफाईचे काम हे ४० टक्केच झाल्याचे म्हटले असून उर्वरीत ६० टक्के कामांमध्ये अनियमितता दिसून आल्याचे म्हटले आहे.
दिवसाला १२४४ ट्रकच्या फे-या होणे अपेक्षित होते. याप्रमाणे एकूण ५६ हजार फे-या व्हायला हव्या होत्या. परंतु यापैकी केवळ २२ ते २३ हजार ट्रकच्याच फे-या झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पहिल्या तीन कंत्राटदारांप्रमाणेच ठपका ठेवत सर्वच कंत्राटदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे म्हटले आहे.
या कंत्राटदारांविरोधात होऊ शकतो एफआयआर
हेमांग कंस्ट्रक्शन, इंद्र कंस्ट्रक्शन, एस. के. एंटरप्रायझेस, नंदिश कंस्ट्रक्शन, मर्शिया इन्फ्राटेक, अरिहंत कार्पोरेशन, टि. ए. एंटरप्रायझेस, आर. के अँड ब्रदर्स, ओमकार इंजि. अँड कॉन्ट्रक्टर, चौधरी कंस्ट्रक्शन कंपनी, के. आर. एस अँड जैन असोसिएट्स, मनीषा कंस्ट्रक्शन, ट्रिनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स, माहिटेक्स, के. बी. ए. इन्फ्रास्ट्रक्चर, पॉप्युलर एंटरप्रायझेस, श्री कविराज इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड, अंबिका कंस्ट्रक्शन, विश्वशक्ती कंस्ट्रक्शन,

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages