"एमटीएनएल' ग्राहकांना देशभरात रोमिंग फ्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"एमटीएनएल' ग्राहकांना देशभरात रोमिंग फ्री

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015   
महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल)च्या ग्राहकांना देशभरात आता रोमिंग मोफत असेल. दूरसंचार विभागाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी (ता. 28) ट्विट करून ही माहिती दिली. त्यामुळे एमटीएनएलच्या ग्राहकांना नववर्षाची एक प्रकारे भेटच मिळाली आहे. 

सोमवारपासून एमटीएनएलला रोमिंग पार्टनर म्हणून बीएसएनएलकडून नेटवर्कसाठी सहाय्य मिळणार आहे. त्यामुळेच ग्राहकांना देशभरात ही सुविधा वापरता येणार आहे. सध्याच्या स्थितीत एमटीएनएलच्या ग्राहकांना मुंबई सर्कलच्या बाहेर देशभर रोमिंगमध्ये असताना इनकमिंग कॉलकरिता पैसे मोजावे लागतात. बीएसएनएल आणि एमटीएनएलमध्ये महसूल कसा वाटून घ्यायचा, याचा निर्णय झाल्यानेच ही घोषणा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages