कुख्यात गुन्हेगार अश्‍विन नाईक आणि चौघा साथीदारांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुख्यात गुन्हेगार अश्‍विन नाईक आणि चौघा साथीदारांना अटक

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 20 Dec 2015
दादर येथील बांधकाम व्यावसायिकाकडून 50 लाखांची खंडणी घेताना कुख्यात गुन्हेगार अश्‍विन नाईक आणि त्याच्या चौघा साथीदारांना परिमंडळ-5 च्या पोलिस उपायुक्तांच्या पथकाने अटक केली. नाईकच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदारांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. 
मध्य मुंबईत गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या एका बिल्डरला नाईकच्या गुंडांनी 9 डिसेंबरला पळवून नेले. त्याला सुभाषनगर येथील कार्यालयात नेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला व 50 लाख रुपये आणि नव्या गृहप्रकल्पात सहा हजार चौरस फुटांची जागा खंडणी म्हणून मागितली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या बांधकाम व्यावसायिकाने खंडणीची रक्कम देण्यासाठी नाईककडे मुदत मागितली होती. त्याच्या भागीदाराकडून नाईकने यापूर्वीच 15 लाखांची खंडणी वसूल केली होती.

खंडणी वसूल करण्यासाठी नाईक आणि त्याचे साथीदार येणार असल्याची माहिती या बांधकाम व्यावसायिकाने दादर पोलिसांना दिली. परिमंडळ-5चे पोलिस उपायुक्त महेश पाटील यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल केला. दादर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे पथक तयार केले. त्यानंतर साध्या वेशात भवानीशंकर मार्ग येथे असलेल्या बिल्डरच्या कार्यालयाजवळ सापळा लावला. इनोव्हा कारमधून नाईक, त्याचे साथीदार प्रमोद केळूसकर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब त्या ठिकाणी आले. बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीची रक्कम घेत असतानाच उपायुक्त पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या पाचही जणांना अटक केली.

अश्‍विन नाईकची टोळी काही दिवसांपासून बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जिवाच्या भीतीने काही जणांनी त्याला खंडणी दिली; मात्र आज झालेल्या कारवाईनंतर नाईकविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी आणखी काही व्यावसायिक पुढे येतील, अशी अपेक्षा कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages