समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री

Share This
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली तसेच यावेळी ‘त्रिशरण पंचशील’ प्रार्थनाही केली.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्तूपावर हेलिकॉप्टरने राज्य शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश देशाला दिला आहे. भारतीय संविधानाद्वारे त्यांनी आधुनिक भारताची मांडणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधोरेखित केलेल्या समता, बंधुता आणि एकात्मतेच्या बळावरच राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती होऊ शकेल.

समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शोषित, पिडीत यांचा विकास करुन समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी समतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages