कांदिवलीतील दामुनगर - मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्या - सचिन अहिर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांदिवलीतील दामुनगर - मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्या - सचिन अहिर

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - ८ डिसेंबर २०१५ 
कांदिवली येथील दामुनगर झोपडपट्‌टीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्यातसेच या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कुटुंबांचे त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून पुनर्वसन करा,अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.  मंगळवारी सकाळी अहिर यांनी दामुनगर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केलीत्यावेळी ते बोलत होते.

सोमवारी दुपारच्या सुमारास दामुनगर येथे भीषण आग लागली होतीया आगीत अनेकांचे संसार अक्षरशभस्मसात झालेझालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सचिन अहिर यांनी या भागाला भेट दिलीया भेटीदरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कीएवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर सरकारच्या वतीने अपेक्षित असलेली मदत होत नसल्याचे आम्हाला दिसून आले आहेत्यामुळे लवकरात लवकर या दुर्घटनेतील पिडीतांना सरकारने शक्य ती सर्व मदत करावी असे आवाहन आम्ही करतोया आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटंुबियांना प्रत्येकी पाच लाखजखमींच्या कुटंुबियांना प्रत्येकी एक लाख आणि ज्यांची घरे या आगीत भस्मसात झालीतत्यांना घरटी किमान पन्नास हजारांची तातडीची आर्थिक मदत सरकारने द्यावीअशी मागणी अहिर यांनी यावेळी केली

तसेच ज्या प्रमाणे आघाडी सरकारच्या काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरचे आम्ही पुनर्वसन केलेत्याच धर्तीवर या आगीत घर जळालेल्या प्रत्येकाचे त्याच जागेवर पुनर्वसन करावेअसेही ते म्हणालेया भेटीदरम्यान त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलेया भेटीदरम्यान अहिर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाणमहिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग यांच्यासह स्थानिक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिडीतांना तातडीची मदत
या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या पिडितांना पक्षाच्या वतीने दोन हजार ब्लँकेटसचे वाटप करण्यात आलेतसेच येत्या दोन दिवसांत आवश्यक भांडी,चटया आणि इतर गृहोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages