मध्य रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक‘ - एसटीच्या 100 जादा गाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2016

मध्य रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक‘ - एसटीच्या 100 जादा गाड्या

JPN NEWS ( Voice Of Citizens ) http://jpnnews.in 
मुंबई - भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई (सीएसटीएम) रेल्वेमार्गादरम्यान असलेल्या हॅंकॉक पूल पाडण्याचे काम रविवारी ( ता.10) दिवसभर करण्यात येईल. त्यामुळे मुंबईत मध्य रेल्वेचा "मेगा ब्लॉक‘ असल्याने पुणे - मुंबई- पुणे प्रवासी रेल्वेगाड्यांची वाहतूक दिवसभर ठप्प असेल. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने 100 जादा बसगाड्यांची विशेष सोय केली आहे. 
या ‘मेगा ब्लॉक‘मुळे पुणे-मुंबई- पुणे धावणाऱ्या सिंहगड, प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन, इंद्रायणी, इंटरसिटी तसेच कोल्हापूर - मुंबई दरम्यान धावणाऱ्या सह्याद्री व कोयना एक्‍स्प्रेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे रेल्वेस्थानकातून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द आहेत. परतीच्या प्रवासातदेखील या रेल्वेगाड्या रद्द असतील. त्याचप्रमाणे सवारी गाड्यादेखील रद्द केल्या आहेत.

मध्य रेल्वेचा मुंबईतील मेगा ब्लॉक लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या पुणे विभागाने मुंबईसाठी 100 जादा बसगाड्यांची विशेष सोय केली आहे. या जादा बसगाड्या मुंबईला जाणाऱ्या नियोजित वेळापत्रका व्यतिरिक्त आहेत. या बसगाड्या रविवारी पहाटेपासूनच स्वारगेट आणि पुणे स्टेशन बसस्थानकांहून सुटतील. या बसगाड्यांमध्ये साधारण, निमआराम आणि शिवनेरी बसगाड्यांचा समावेश असेल. परतीच्या प्रवासातदेखील या बसगाड्या मुंबईतील बसस्थानकांहून उपलब्ध असतील, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad