Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालिकेच्या 147 वार्डमधील पोटनिवणुक 10 जानेवारीला

मुंबई / JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in   
बोरला घाटला व्हिलेज चेंबूर येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 147 मधील नगरसेवक अनिल पाटणकर यांनी कोंग्रेसपक्षाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने या ठिकाणी 10 जानेवारीला निवडणुक होत आहे.

अनिल पाटणकर यांनी कोंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रभागात होणाऱ्या निवडणुकीमधे चेतन मंथनवार (अपक्ष), राजेंद्र नगराले (कोंग्रेस), अनिल पाटणकर (शिवसेना), गणेश पेडणेकर (अपक्ष), नागेश तवटे (अपक्ष), बबिता वाहुळकर (अपक्ष) असे 6 उमेदवार निवडणुक लढवत आहेत. या प्रभागात 45 हजार 732 मतदार आहेत. यामधे स्त्री मतदार 20 हजार 631 तर पुरुष मतदार 25 हजार 100 आहेत. 10 जानेवारी सकाळी 7. 30 ते सायंकाली 5.30 पर्यंत 6 मुख्य तर इतर 39 मतदान केंद्रे असणार आहेत. मतमोजणी 11 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेने कळविले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom