"नेट न्युट्रॅलिटी'विषयी ट्रायकडे 24 लाख सूचना - हरकती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"नेट न्युट्रॅलिटी'विषयी ट्रायकडे 24 लाख सूचना - हरकती

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई - ट्रायकडे (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) "नेट न्युट्रॅलिटी‘शी संबंधित "डिफरेन्शिअल डेटा प्राइसिंग‘च्या प्रबंधावर 24 लाख सूचना आणि हरकती आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी नुसत्या फेसबुक "फ्री बेसिक‘ला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या 18 लाख आहे. 

ट्रायच्या प्रबंधावर सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. 7) मुदत होती. प्राधिकरणाकडे आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा 24 लाख सूचना आणि हरकती आल्या आहेत. फेसबुकने ई-मेलद्वारे मोहीम सुरू करत "फ्री बेसिक‘ला पाठिंबा देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटवर मोहीम सुरू केली होती. तसेच, वृत्तपत्रांतही मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचा आधार फेसबुकने घेतला. महत्त्वाचे म्हणजे, फेसबुकने "सेव्ह द इंटरनेट फोरम‘च्या ई-मेल सारखीच पद्धत "फ्री बेसिक‘ला पाठिंबा मिळवण्यासाठी वापरली होती. ट्रायकडे फेसबुकने मांडलेल्या प्रतिसादात "फ्री बेसिक‘सारख्या "झीरो रेटेड प्लॅटफॉर्म‘वर बंदी आणू नये, अशी मागणी केली होती. "फ्री बेसिक‘चा उद्देश अधिकाधिक भारतीयांना इंटरनेटवर आणण्याचा आहे, तसेच "इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी‘ भारतभर वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages