मुंबईत 9 वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत 9 वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई- मुंबईतील दादर परिसरातील एका नामवंत शाळेत एका 9 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारची असून, शाळेतील 20 वर्षीय कर्मचा-याने संबंधित मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, दादर परिसरातील शिवाजी पार्क जवळील एका शाळेतील ही घटना आहे. शुक्रवारी दुपारी 20 वर्षीय कर्मचा-याने 9 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. त्यामुळे मुलगी शाळेच्या बाथरूममध्ये लपून बसली. मात्र, पालकांनी मुलगी अजून कशी आली नाही म्हणून शाळा गाठली. तेथेही आढळून आली नाही. थोड्या वेळाने बाथरूममध्ये धावत येताना दिसली. त्यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तेथेच कर्मचारी असेलल्या 20 वर्षीय तरूणाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर मुलीला दवाखान्यात दाखल केले. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी संबंधित कर्मचा-याला अटक केली आहे. दादरमधील शिवाजी पार्कात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages