सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन हँकॉक पूल इतिहासजमा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन हँकॉक पूल इतिहासजमा

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens )www.jpnnews.inDisplaying IMG_0420.JPG  मुंबई : १८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची वेळ, मनस्ताप सहन करूनही प्रवाशांनी दाखवलेली सहनशीलता आणि दिवसभर ६५० रेल्वे कामगारांचा असलेला राबता अशा घडामोडीनंतर अखेर १३६ वर्षे जुना सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन हँकॉक पूल इतिहास जमा झाला. रविवारी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई पालिकेकडून हँकॉक पूल पाडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रेल्वेच्या अनेक प्रकल्पांनाही गती मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

भायखळा ते सॅन्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान कमी उंची, धोकादायक स्थिती, यामुळे रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत असलेला हा पूल तोडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय निर्णय पालिका आणि रेल्वेने घेतला. पालिकेने हा पूल तोडण्याचे काम साधारपणे नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू केले होते. मात्र, रेल्वे ट्रॅकवरील या पुलाचा भाग तोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ९ जानेवारीच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. कोणत्याही स्थितीत १० जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निश्चय मध्य रेल्वेने केला होता. या कामासाठी १८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. मेन लाइनवरील सीएसटी ते भायखळा दरम्यानच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्याचे अचूक नियोजन रेल्वे प्रशासनाने केले.
रविवारी दिवसभर काम सुरू राहणार असल्याने १०० पेक्षा अधिक लोकल फेऱ्या, ४२ लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. शिवाय ४२ ट्रेनचे सुरुवातीचे व शेवटचे थांबेही बदलण्यात आल्याने रविवारचा दिवस प्रवाशांसाठी अत्यंत जिकिरीचा ठरला. दुपारनंतर काही स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती, परंतु गेले काही दिवस प्रसारमाध्यम आणि रेल्वे प्रशासनाकडून हँकॉक पुलाबाबत सतत माहिती देण्यात येत होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही, तर हार्बर मार्गावरून सीएसटीपर्यंत पोहोचता येणे शक्य असल्याने, अनेकांनी हार्बरचा पर्यायही निवडला होता. यशस्वी नियोजनामुळे उपनगरीय स्थानकांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रवाशांनीही सहनशीलता ठेवत रेल्वेच्या नियोजनाला प्रतिसाद दिला.
दरम्यान, हँकॉक पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेचे ६५० रेल्वे कामगार व कर्मचारी, ५० अभियंते उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात यंत्र सामुग्रीही त्यांच्या मदतीला होती. लोखंडी पूल पूर्णपणे तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस कटर आणि चार क्रेनचाही वापर करण्यात आला. अखेर हा पूल तोडण्याचे काम सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्ण झाले. त्या नंतर सीएसटी ते भायखळ््यापासूनची लोकल सेवा सुरू करण्यात आली. या कामावेळी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages