हार्बर सिलींकसाठी निविदा प्रक्रिया मार्चमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2016

हार्बर सिलींकसाठी निविदा प्रक्रिया मार्चमध्ये


मुंबई / JPN NEWS.in / 2 Jan 2016
शिवडी ते नावा शेव ट्रांस हार्बर सिलींकसाठी येत्या मार्चमध्ये निविदा प्रक्रिया सुरू होणार आहेत. हा प्रकल्प जपानच्या जायका लोनच्या माध्यमातून केला जाईल. संपूर्ण प्रकल्पाची किंमत ११ हजार ४०० कोटी रूपये एवढी असणार आहे. हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण केला जाईल. ट्रांस हार्बर सिलींकची लांबी २२ किलोमीटर असणार आहे. ही निविदा नवी मुंबई विमानतळासाठी मागवली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री सचिवांनी दिली. 


मुंबई कोस्टल रोडला अंतिम हिरवा कंदील    मुंबईतील महत्त्वकांक्षी कोस्टल रोड सागरी मार्गाची अंतिम अधिसूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून घोषित करण्यात आली. मुंबई कोस्टल रोडला अंतिम हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. नरिमन पॉइंट ते उत्तर मुंबई मधील कांदिवली येथे जोड़नारा सागरी मार्ग हा 35.6 किलो मीटर लांब असणार आहे. सागरी मार्गासाठी राज्य सरकार 160 हेक्टर समुद्रामध्ये भराव करणार आहेत. हा भराव प्रकल्पातील 9.8किमी च्या पट्यासाठी आवश्यक आहे आणि त्यधिक 8 किमी चा पट्टा हा, तीन ठिकाणी कांदळवने कापला जाईल. हा प्रकल्प सुमारे 1300 हजार कोटींचा आहे. याआधी समुद्रामध्ये भराव करण्यास CRZ कायद्याअंतर्गत मनाई होती. मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस यांच्या प्रयत्नानंतर ह्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि आता समुद्रात भराव करण्यास मनाई नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad