सत्ताधा्रयांच्या तावडीतून सर्व मैदानांची सुटका होईपर्यंत संघर्ष करणार - सचिन अहिर यांचे
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा आणि मैदाने खाजगी तत्वावर दत्तक देण्याच्या धोरणाला राज्य सरकारे स्थगिती दिल्यानंतर काही नेत्यांनी आपल्या ताब्यातील जागा महापालिकेला परत केल्या असल्या तरीही अजून अनेक मैदाने शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या ताब्यात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. ही सर्व मैदाने जोपर्यंत सत्ताधा्रयांच्या कचाट्यातून बाहेर पडत नाहीत, तो पर्यंत या मुद्द्यावर संघर्ष सुरुच राहिल, असेही ते म्हणाले.
कोणत्याही शहरातील मोकळ्या जागा किंवा मैदाने ही शहरांची फुफ्फुसे असतात. मात्र अगोदरच शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी मुंबईतील अनेक मोकळी मैदाने आपल्या ताब्यात घेऊन त्याचा खाजगी आणि व्यावसायिक वापर सुरू केला आहे. याबाबतचे सुधारीत धोरण काही दिवसांपुर्वी महापालिकेतील सत्ताधा्रयांनी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता मंजूर केले. मात्र त्या विरोधात समाजाच्या सर्वच थरातून नाराजीचे सूर उमटताच मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत या धोरणाला स्थगिती दिली होती. मात्र अजूनही अनेक मैदाने शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या ताब्यात असून त्या विरोधात संघर्ष करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे केली असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी स्वाक्षरी मोहिमेला शहरात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आल्याचे सांगत मा. अहिर म्हणाले की, मैदाने मोकळी न केल्यास पुढच्या टप्प्यात या मैदानांना घेराव घालण्याचे आंदोलन हाती देण्यात येईल. तसेच मैदाने, बीडीडी चाळींचा पुनर्विकास आणि भाडे नियंत्रण सुधारणा कायदा या मुद्द्यांवर आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांनी भेट घेणार आहोत, असेही ते म्हणाले