खेरवाडी येथील छत्रपती शिवाजी मैदानामधील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2016

खेरवाडी येथील छत्रपती शिवाजी मैदानामधील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याचे निर्देश

मुंबई  JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in - मैदाने आणि उद्याने दत्तक तत्वावर देण्यावरून पालिकेत रान उठले असताना पालिकेची कोणतीही परवानगी नसताना वांदे खेरवाडी येथील छत्रपती शिवाजी मैदानच एका संस्थेने क्रीडा अकादमीच्या माध्यमातून लाटले आहे. पालिकेच्या बाजार उद्यान समिती अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही गंभीर बाब उजेडात आली. अध्यक्षांनी हे बेकायदेशीर अतिक्रमण बेकायदेशीर असल्यास हटविण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

मोकळी मैदाने आणि उद्याने भाडे तत्त्वावर देण्याचा पास्ताव शिवसेना आणि भाजपा युतीने बहुमताच्या बळावर मंजूर केल्याने विरोधी पक्षाचे सदस्य संतप्त झाले. त्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज खेरवाडीतील हे मैदान एका खासगी संस्थेने बळकावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मैदान वाचविण्याची मागणी बाजार उद्यान समितीचे अध्यक्ष अजित भंडारी यांच्याकडे केले आहे. स्थानिक नागरिकांनीही या मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी त्यांच्याकडे केली. मैदानेही स्थानिक नागरिकांसाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी मोकळी राहिली पाहिजेत. तेथील अतिक्रमणे हटवा, विना परवाना कोणालाही अतिक्रमण करता येणार नाही निर्देश भंडारी यांनी प्रशासनाला दिले. 
स्थानिक नगरसेविका डॉ. गुलिस्ता शेख, नगरसेवक अनिल त्रिंबककर आदी यावेळी भंडारी यांच्या समवेत होते अकादमीच्या माध्यमातून क्रीडांगणावर जाळी लावून किकेट खेळला जातो. तसेच करम खेळण्यासाठी येथे इमारत बांधली आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. हे अनधिकृत बांधकाम तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. या मैदानाचा गैरवापर होत असून मैदानातील झाडेही कापण्यात आल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी भंडारी यांच्याकडे केल्या. येथे सुरक्षा रक्षक पूर्णवेळ तैनात करावे, अशी मागणीही झाली.

Post Bottom Ad