राज्याचे परिवहन मंत्री रावते यांच्या गाडीला अपघात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्याचे परिवहन मंत्री रावते यांच्या गाडीला अपघात

Share This


मुंबई / JPN NEWS.in राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला असून रावते सुदैवाने बचावले आहेत. त्यांच्या ड्रायव्हरला मुका मार लागला आहे. आज बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. धडक एवढी जोरदार होती की गाडीचा ड्रायव्हरच्या बाजुचा भाग पार चेपला गेल्याचे दिसत आहे. 
रस्त्यावरील सुरक्षा आणि रॅश ड्रायव्हिंगला प्रतिबंध कसा करता येईल यांसदर्भातली महत्त्वाची बैठक संपवून रावते परत येत होते. त्यावेळी लोअर परेलमध्ये फिनिक्स मिलजवळ एका भरधाव गाडीने रावतेंच्या गाडीला धडक दिली. रावते यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, व थो़ड्याच वेळात त्यांना डिसचार्जही देण्यात आला. रावतेंच्या गाडीला धडक देणा-या गाडीच्या ड्रायव्हरला एन. एम. मार्ग पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages