बोरला घाटला गांव, प्रभाग १४७ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर विजयी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बोरला घाटला गांव, प्रभाग १४७ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर विजयी

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in
मुंबई / प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका बोरला (मध्य) घाटला गाव प्रभाग क्र. १४७ च्या दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचे अनिल रामचंद्र पाटणकर हे ११,५१७ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्र श्रीराम नगराळे यांचा ६,६२७ मतांनी पराभव केला. राजेंद्र श्रीराम नगराळे यांना ४,८९०  मते मिळाली.


१० जानेवारी रोजी झालेल्या या पोटनिवडणुकीत एकूण ४७.०८ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रभाग क्रमांक १४७ चे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागात एकूण एकूण ४५ हजार ७३२ मतदारांपैकी २१ हजार ५३१ जणांनी मतदान केले असून ही टक्केवारी ४७.०८ इतकी आहे. एकूण २५ हजार १०० पुरुष मतदारांपैकी ११ हजार ८५३ तर एकूण २० हजार ६३१ स्त्री मतदारांपैकी ९ हजार ६७८ स्त्रियांचा यामध्ये समावेश आहे.

या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार मंथनवार चेतन सूर्यभान यांना २५७, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र श्रीराम नगराळे यांना ४,८९०, अनुक्रमे अपक्ष उमेदवार गणेश रमेश पेडणेकर यांना १२८, नागेश अनंत तवटे यांना ४,३१७ तर बबिता विलास वाहुळकर यांना १०८ मते मिळाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकीत या प्रभागातून (प्रभाग क्रमांक १४७) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल पाटणकर यांनी शिवसेना उमेदवार तुकाराम काते यांचा पराभव केला होता. अनिल पाटणकर यांना १०,२७९ मते तर तुकाराम काते यांना ९९९२ मते प्राप्त झाली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages