मुंबई काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2016

मुंबई काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी

JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in         मुंबई : मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे रुपांतर मंगळवारी हाणामारीत झाले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत माजी मंत्री, आमदार नसीम खान आणि आमदार अस्लम शेख हे दोघे एकमेकांशी भिडले. दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक हमरीतुमरीवर आले आणि त्यांच्यात हाणामारीही झाली. हि हाणामारी रोखण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थीसाठी धाव घ्यावी लागली. राहुल गांधी यांच्या १५ व १६ जानेवारी रोजीच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीसाठी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. त्या वेळी हा प्रकार घडला. 

राहुल गांधी यांचा कार्यक्रम उत्तर मुंबईत ठेवण्यात येणार असल्याची माहिती निरुपम यांनी बैठकीत दिली. मात्र त्यास नसीम खान यांनी आक्षेप घेत हा कार्यक्रम पक्ष कार्यालयातच व्हावा, असा आग्रह धरला. याला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला. या प्रकारामुळे नाराज होत अस्लम शेख यांनी नसीम खान यांच्याबद्दल अनुद्गार काढले. शेख यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित खान समर्थकांनी हरकत घेतली. यानंतर दोन्ही गटांकडून घोषणाबाजी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचले. नसीम खान आणि अस्लम शेख व त्यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. आमदार आणि पदाधिकारी यांच्यात हाणामारी झाली. परंतू काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी मध्ये पडून हाणामारी थांबवली. यानंतर बैठक संपन्न झाल्यावर नसीम खान आणि अस्लम शेख या दोन्ही आमदारांनी पत्रकारांशी बोलताना असा प्रकार घडलाच नसल्याची माहिती दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad