Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गेल्या सात वर्षांपासून भाजप जीएसटी मंजूर होऊ देत नाही - राहुल गांधी

मुंबई JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली माझ्याकडे जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आले नव्हते, तर ते त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी भेटीला आले होते. गेल्या सात वर्षांपासून भाजप जीएसटी मंजूर होऊ देत नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. मुंबईतील एनएमआयएमएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. केंद्र सरकारकडून आजपासून सुरू करण्यात येणारी स्टार्टअप योजना आणि असहिष्णुता हे दोन्ही मुद्दे एकत्रपणे येऊ शकत नाही, असेही मत त्यांनी मांडले. 

राहुल गांधी म्हणाले, ‘‘जेटलीजी माझ्या भेटीला आले तेव्हा चर्चा झाली होती, की जीएसटीवर चर्चेसाठी गेले होते. पण, प्रत्यक्षात ते माझ्याकडे मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. जीएसटीमुळे नागरिकांवर कराचा अधिक बोजा पडू नये असे आम्हाला वाटते. जीएसटीवरून भाजपमध्येच मतभेद आहेत. सर्वप्रथम काँग्रेस पक्षानेच जीएसटी विधेयक संसदेत आणले होते. पण,  आम्ही सांगितलेले बदल ते यामध्ये सहभागी करून घेत नाहीत. जेटली आणि पंतप्रधान मोदींना ते मंजूर करू द्यायचे नाही. आपले सध्याचे सरकार शेतकरी आणि शेतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे दुर्दैवी आहे. मोदी सरकार शेतीधोरण चुकीच्या पद्धतीने अवलंबत आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, पुढील दहा वर्षे सत्ता उपभोगण्याच्या उद्देशाने सरकार सगळीकडे संथगतीने वागत आहे. संसद रोखण्याचा आमचा कोणताही मानस नाही. स्टार्टअप उद्योगात लहान उद्योगांना प्राधान्य हवे.‘‘ 

केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारशैली प्रखरपणे राबविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप हिंदू, मुस्लिम, शीख असा भेदभाव करते. पण, आम्ही प्रत्येक नागरिकाकडे फक्त भारतीय या नजरेनेच बघतो. मला विश्वास आहे, की भारत चीनच्या पुढे जाईल. क्रिकेटरांनीच क्रिकेट चालवावे, राजकिय नेत्यांनी क्रिकेट संघटनांमधून बाजूला व्हावे, असे मत राहुल गांधी यांनी मांडले. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमा ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळावर नियंत्रण मिळविले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom