अन्यथा कोकणचाही ‘मराठवाडा’ होईल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अन्यथा कोकणचाही ‘मराठवाडा’ होईल

Share This
समुद्रात जाणारे पाणी आताच रोखा, अन्यथा कोकणचाही ‘मराठवाडा’ होईल
मुंबई / JPN NEWS.in — कोकणातील समुद्रात जाणारे पाणी आताच रोखायला हवे. नाही तर येत्या दोन—चार वर्षांत कोकणचाही मराठवाडा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा ‘मॅगसेसे’ पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी दिला. तसेच मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी मराठवाड्यात उसाची शेती करण्यास बंदी घालावी आणि साखर कारखाने बंद करावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

येत्या १५ ते १९ जानेवारीपर्यंत पार पडणार्‍या कोकण जलपरिक्रमाची माहिती देण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानने पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र सिंह बोलत होते. राजेंद्र सिंह म्हणाले की, हवा—पाण्यातील बदलामुळे सध्या देशभर पूर आणि दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. आकाशातून येणारे पाणी साठवून ठेवले पाहिजे याचे भानच देशाला राहिलेले नाही. त्यामुळेच मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात वाया जाणारे पाणी आताच अडवले नाही तर कोकणाचीही तिच स्थिती होईन. मात्र असे असले तरी आज तरी कोकणच आशेचा किरण आहे. त्यामुळे कोकणातले पाणी समुद्रात जाण्याऐवजी भूगर्भात जाण्यासाठीची व्यवस्था करायला हवी. मराठवाड्यातील लोक उद्योगात अडकले राजस्थानातील अलवारमध्ये मराठवाड्यापेक्षा कमी पाऊस पडूनही आम्ही अलवारला हिरवेगार केले. 

मराठवाड्यातही हे घडू शकते, परंंतु मराठवाड्यातील लोक उद्योग, सबसिडी आणि उसाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, असे सांगतानाच म्हणूनच जमीनीचा पोत सुधारायचा असेल आणि मराठवाड्याला सुखी—समृद्ध करायचे असेल तर मराठवाड्यात उसाची शेती करण्यास आणि साखर कारखाने चालविण्यास मज्जाव करायला हवे असेही ते म्हणाले. 

देशातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी देशात जलसाक्षरता करण्याची गरज आहे. तसेच हवा—पाण्यात होणार्‍या बदलांबाबत सरकार आपली दिशाभूल करत आहे. तर संशोधक आणि वैज्ञानिक वास्तव सांगत नाहीत असे सांगतानाच सरकार माझे ऐकत नाही. त्यांना वाटते मी वेडा माणूस आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मी देशातील १७ देश पाहून आलो. युरोप आणि पाश्‍चात्य देशांत पाण्याची समस्या मोठी आहे. पाण्यावरून तिकडे विश्‍वयुद्ध होईल अशी स्थिती असल्याचेही ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages