Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी १९ जानेवारीला धरणे आंदोलन

मुंबई / प्रतिनिधी / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in 
मुंबई मधील रिक्षा चालकांच्या विविध मागण्याकडे राज्य सरकार आणि परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याने येत्या १९ जानेवारीला बांद्रा पूर्व येथील परिवहन आयुक्तांच्या कार्यालयावर हजारो रिक्षाचालक मालक धरणे आंदोलन करतील असा इशारा मुंबई ऑटोरिक्षा टयाक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव आणि सरचिटणीस शंकर साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुंबई मधील अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर निर्बंध घालावे, ओला उबर टयाक्सी फॉर शुअर सारख्या अवैध कंपन्यांवर बंदी आणावी, परमिटसाठी मुंबई महानगर पालिका क्षेत्रासाठी १५ हजार तर अन्य विभागांसाठी १० हजार रुपये भरण्याची अट रद्द करून २०० रुपयात परवाने मिळावेत, मुंबईच्या प्रवाश्यांना सेवा देण्यासाठी नवीन १ लाख परवान्यांचे वितरण करावे, ऑटोरिक्षा चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, ऑटोरिक्षा चालक मालकांना पब्लिक सर्व्हंटचा दर्जा द्यावा, ऑटोरिक्षा चालक मालकांना कमी दरात घरे उपलब्ध करून द्यावीत त्यांच्या गृहनिर्माण सोसायट्याना जागा उपलब्ध करून द्यावी, तीन वर्षापेक्षा अधिक काळ लायसन्स असलेल्या ऑटोरिक्षा चालकांना त्वरीत ब्याज द्यावा अश्या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन असल्याचे शशांक राव यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी १७ जून २०१५ ला ऑटोरिक्षा टयाक्सीमेन्स युनियनने चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन केले होते. त्या वेळी केलेल्या मागण्यांपैकी परवान्याकरिता शिक्षणाची अट रद्द करावी व मृत परवाने जीवित करावे या दोनच मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी इतर आमच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत. आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी १९ जानेवारीला पुन्हा धरणे आंदोलन करत असलो तरी या दिवशी ७ ते ८ हजार रिक्षा चालक मालक या धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याने रिक्षा सेवावर कोणताही परिणाम होणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom