वाहनचोरीप्रकरणी चिता कॅम्पमधीलन गरसेविकेचा पती राजू बटला पोलिसांच्या ताब्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2016

वाहनचोरीप्रकरणी चिता कॅम्पमधीलन गरसेविकेचा पती राजू बटला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई / www.jpnnews.in - मानखुर्द गोवंडी चिता कॅम्पमधील शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका खैरुनिसा अकबर हुसेन यांचे पती अकबर हुसेन उर्फ राजू बटला याला वाहनचोरीप्रकरणी शनिवारी (ता. 23) जुहू पोलिसांनी ताब्यात घेतले. 

चोरीच्या ऑडी मोटारीतून तो फिरत होता. जुहूतील वकिलाने कार चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. हीच कार शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी आझाद मैदानातील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर उभी असल्याची माहिती वकिलाला मिळाली होती. त्यानुसार तो पोलिसांना सोबत घेऊन तेथे गेला. तेव्हा शेकापतून नुकतेच कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले अकबर हुसेन ऊर्फ राजू बटला वापरत असल्याचे समजले. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्याला कारविषयी विचारले तेव्हा चिता कॅम्पमधील आपण नगरसेवक असल्याचे त्याने सांगितले. त्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याची बायको खैरुनिसा नगरसेविका असल्याचे कळले. नंतर शनिवारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने शेतकरी कामगार पक्षाचे मुंबई चिटणीसपद मिळवले होते. विधानसभेची निवडणूक त्याने लढवली होती. अलीकडे त्याने कॉंग्रेस पक्षात प्रवेश मिळवला. गुन्हेगारीतून मिळवलेले पैसे तो राजकारणात खर्च करत होता. 

अडवानींच्या हत्येच्या कटासह 21 गुन्हे 
लालकृष्ण अडवानी यांच्या हत्येचा कट आखण्यात तो सामील होता. चोरी, तस्करी आणि क्रेडिट कार्डचे क्‍लोनिंग करून खात्यातून पैसे चोरल्याचे गुन्हे त्याच्यावर आहेत. गेल्या वर्षी नेरळमधील त्याच्या फार्म हाऊसमध्ये चंदनाचा साठा व चोरीचा कंटेनर सापडला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे कळताच त्याचा जमीन रद्द झाला आहे. हुसेनवर ट्रॉम्बे, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, पंतनगर, सांताक्रूझ, नेरळ आणि उरणसह कर्नाटक व आंध्र प्रदेशातही 21 गुन्हे नोंद आहेत.

Post Bottom Ad