चंदनवाडी स्मशानभूमीत उभारलेला बेकायदा फोर-जी टॉवर जमीनदोस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2016

चंदनवाडी स्मशानभूमीत उभारलेला बेकायदा फोर-जी टॉवर जमीनदोस्त

मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in चंदनवाडी येथील हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर उभारलेला बेकायदा फोर-जी टॉवरविरोधात जनआंदोलन उभे राहताच पालिकेने अखेर तो जमीनदोस्त केला. त्याचबरोबर बेकायदा खोदकाम करणाऱ्या रिलायन्स कंपनीवरही एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा यांच्या कोपऱ्यात फोर-जी टॉवर बांधण्यात यावेत, या अटीवर पालिकेने रिलायन्स कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली होती़ मात्र, कंपनीने दोन दिवसांपूर्वी द बॉम्बे हिंदू बर्निंग व बरियल ग्राउंड कमिटीच्या खासगी स्मशानभूमीची १५ फुटांची आवार भिंत तोडून आत प्रवेश करीत, पाईलिंग मशीन लावून खोदकाम सुरू केले. त्यामुळे या ठिकाणी पुरण्यात आलेले लहान मुलांचे अवशेष बाहेर आले. सीमेंट काँक्रिटचे फाउंडेशन तयार करताना पालिकेच्या सी विभाग कार्यालय व आरोग्य विभागाची परवानगी घेण्यात आली नव्हती. 

Post Bottom Ad