राज्य माहिती आयोगाचे महापालिका आयुक्तांना आदेश
मुंबई महानगरपालिकेच्या ऑडीटवर भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षकानी (क्याग) नोंदवलेले आक्षेप आणि त्यावर महापालिकेने केलेwली कारवाई याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवूनही माहिती दिली नसल्याने महापालिकेने अशी माहिती एका महिन्यात संकेत स्थलावर टाकावेत तसेच माहिती अधिकार कर्यकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून 5 रुपये देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ऑडीटवर भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षकानी (क्याग) यांनी कोणते आक्षेप घेतले आहेत, कोणते ताशेरे ओढले आहेत अश्या आक्षेप आणि ताशेरे यावर पालिकेने कोणती कारवाई केली याबाबतची माहिती आरटीआय मधे मागवली होती. महापालिकेच्या चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी यांच्या कार्यालयाने अशी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अपील अधिकारी यांच्याकड़े अपील करूनही शरद यादव यांना माहिती देण्यात आलेली नव्हती.
महापालिकेचा लेखा चाचणी परिक्षा विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने यादव यांनी राज्य माहिती आयोगाकड़े अपील केले होते. या अपिलावर सुनवाईनंतर भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षकानी (क्याग) सन 2010 -11 पासून आता पर्यंतचे लेखा आक्षेप अहवालाबाबतची सर्व माहिती 29 फेब्रुवारी 2016 पर्यंत महापालिकेच्या संकेत स्थाळावर प्रसिद्ध करावेत तसेच महापालिकेने ही माहिती देण्यासाठी केलेल्या अक्षम्य विलंबामुले अपीलकर्त्याना 5 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश रत्नाकर गायकवाड यांनी महापालिका आयक्त अजोय मेहता यांना दिले आहेत.