वाहतुकीचे नियम धाब्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2016

वाहतुकीचे नियम धाब्यावर

वाहतूक पोलिस विभागाकडील आकडेवारी नुसार भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सन 2013 मध्ये 574 अपघात झाले यामध्ये 595 लोकांचा मृत्यू झाला. सन 2014 मध्ये 574 अपघात झाले यामध्ये 598 लोकांचा मृत्यू झाला. तर सन 2015 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 465 अपघात होऊन 490 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील व्ही. पी. रोड, गावदेवी, शिवाजी पार्क, निर्मलनगर आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही गंभीर अपघात झालेला नाही. विक्रोळी, चेंबूर, शिवाजीनगर आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अधिक गंभीर अपघात झाल्याची नोंद आहे. 

नव वर्षाच्या सुरुवातीलाच नियम तोडणाऱ्यावर वाहतूक पोलिस कारवाई करत असतात सन 2012 मध्ये 840 सन 2013 मध्ये 570 सन 2014 मध्ये 523 तर सन 2015 मध्ये 705 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. नववर्षाच्या स्वागतात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 705 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली; त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. वर्षभरात 18 हजार 35 तळीराम चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. "नो पार्किंग‘मध्ये वाहने उभी करणाऱ्या एक हजार 115 जणांवर, तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 92 चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. रात्री भाडे नाकारणाऱ्या 13 जणांवर कारवाई झाली.

हि आकडेवारी पाहिल्यास २०१३ आणि २०१४ पेक्षा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या संखेत वाढ झाल्याने राज्य सरकारने ६ जानेवारीपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईत परिवहन विभाग आणि पोलिसांची संयुक्त मोहीम राबवून करण्यात आलेल्या कारवाईत, 6,7 आणि 8 जानेवारी या दिवशी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त तपासणी मोहिमेत 604 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची  कारवाई करण्यात आली आहे. 

या मोहिमे दरम्यान मालवाहू वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त भाराचा माल वाहून नेणाऱ्या 144 ,प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणाऱ्या 3,अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 107, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या 59, सीट बेल्ट न वापरणारे 116, वाहन चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्या 457, वाहन अती वेगाने चालविणाऱ्या 3 आणि सिग्नल तोडणाऱ्या 274 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत ६ आणि ७ जानेवारी या दोन दिवसात एकूण 9 लाख 54 हजार 720 रुपयांची दंड वसुली करण्यात आली असल्याचेही या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

8 जानेवारी रोजी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 336 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.त्यामध्ये मालवाहू वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त भाराचा माल वाहून नेणाऱ्या 59 ,प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणाऱ्या 3,अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 47, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या 32, सीट बेल्ट न वापरणारे 52, वाहन चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्या 234, वाहन अती वेगाने चालविणाऱ्या 1 आणि सिग्नल तोडणाऱ्या 91 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.या मोहिमेत दोन दिवसात एकूण 4 लाख 73हजार 250 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांना दिवसाला ४ लाख ५० हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत असले तरी नियम तोडणाऱ्यांची संख्याही विचार करायला लावणारी आहे. 

मुंबईमध्ये विशेष करून तरुणपिढी कढून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात. बाईकस्वार, ट्रक, बस, रिक्षा, महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाच्या चालकांची वाहन चालवायची पद्धत बघितल्यास वाहतूक विभागाचे पोलिस अश्या चालकांना वाहन परवाना देतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक परवाने निलंबित करणे, परवाना रद्द करणे हि शिक्षा पोलिस आणि सरकारला जरी योग्य वाटत असली तरी या शिक्षेपेक्षा अश्या चालकांना समुपदेशनाची खरी गरज आहे. 

अपघात झाल्यास गाड्यांचे नुकसान खाजगी गाड्यांचे मालक चालक आपल्या गाड्यांना जपत असतात. परंतू अशी काळजी बाईकस्वार, ट्रक, बस, रिक्षा, महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांचे चालक कधीच घेत नाहीत. बाईकस्वार वगळल्यास ट्रक, बस, रिक्षा, महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या वाहन चालकांकडे स्वताची वाहने नसतात. यामुळे कश्याही प्रकारे वाहन चालवण्याची मानसिकता या चालकांची असते. तरुण बाईकस्वार तर रस्त्यावर जागा नसल्यास फुटपाथवरही वाहने चालवत असतात. कोणत्या रत्यावर किती स्पीड मध्ये गाडी चालवावी, गाड्या कोठे पार्किंग कराव्यात, बाजूने किंवा एखादे वाहन पुढे चालत असताना आपले वाहन कसे चालवावे, बस ट्रक टेम्पो पालिकेच्या कचरा वाहणाऱ्या गाड्या कश्या चालवाव्यात अश्या सर्वच बाबतीत चालकांना समुपदेशन करण्याची गरज आहे. 

अश्या चालकांना ऑनलाईन आणि गाडी चावण्याची परीक्षा पास झाल्यावर परवाने मिळतात. परवाना मिळाला म्हणजे सर्व नियम धाब्यावर बसवत रस्ता आपल्या मालकीचा असल्या प्रमाणे गाड्या चालवल्या जातात. यामधूनच अनेक अपघात होतात. राज्य सरकारच्या आदेशाने किंवा वाहतूक पोलिस स्वताहून पुढाकार घेऊन दर वर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजीत करतात. सप्ताह पुरता धडक कारवाई सुरु असल्याने सगळे नियम पाळले जातात. नंतर मात्र पुन्हा नियम धाब्यावर बसवले जातात. याची दखल राज्य सरकार आणि वाहतूक पोलिस विभागाने घेवून अश्या चालकांना परवाना देताना आणि परवाना मिळाल्यावर अधून मधून समुपदेशन केल्यास अपघातांचे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याची संख्या नक्की कमी होऊ शकते. 
अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३ 
www.jpnnews.in  

फाईल फोटो 
Inline images 1

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad