दररोज 2,33,635 प्रवाशी
उत्पन्नही सर्वाधिक रु 14,94,538/-
गर्दीच्या टॉप 5 मध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर आणि कुर्ला यांचा समावेश
मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
सीएसटी पासून कसारा,खोपोली,पनवेल,अंधेरी आणि ठाणे-वाशी-नवी मुंबई पाच सेवाअंतर्गत 85 रेल्वे स्थानकात धावणा-या मध्य मुंबई रेल्वेत सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानकात डोंबिवली स्थानक अव्वल असून दररोज 2,33,635 प्रवाशी प्रवास करतात तर कमाईत सुद्धा डोंबिवली स्थानक असून रु 14,94,538/- उत्पन्न असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दररोज 38,55,419 प्रवाश्यांचा भार सोसणा-या मध्य आणि हार्बर रेल्वेचे उत्पन्न रु 2,19,12,837/- इतके आहे. गर्दीच्या टॉप 5 मध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर आणि कुर्ला यांचा समावेश आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे दररोज प्रवास करणारे प्रवाशी, एकुण उत्पन्न आणि स्थानक स्तरावर प्रवाशी संख्या याची माहिती विचारली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक डॉ आलोक बडकुल यांनी अनिल गलगली यांस कळविले की सीएसटी पासून पर्यंत 85 रेल्वे स्थानकात धावणा-या मध्य मुंबई रेल्वेचे एकूण उत्पन्न रु 2,19,12,837 /- इतके असून दररोज प्रवाशांची संख्या 38,55,419 इतकी आहे. सर्वाधिक गर्दीचे स्थानक डोंबिवली असून येथून दररोज 2,33,635 प्रवाशी आपल्या प्रवासाची सुरुवात करतात. त्यानंतर ठाणे (2,25,490), कल्याण(1,80,676), घाटकोपर (1,74,926) आणि कुर्ला (1,50,708) अशी क्रमवारी आहे.
# दररोज उत्पन्न रु 2,19,12,837/-
मध्य आणि हार्बर रेल्वेचे उत्पन्न दररोज 2,19,12,837/- इतके असून येथेही डोंबिवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. डोंबिवली ( 14,94,538 ), ठाणे (13,84,020), कल्याण(12,55,045), घाटकोपर (9,32485) आणि सीएसटी (8,97,373) अशी उत्पन्नाची क्रमवारी आहे.
# 121 रेकस आणि 1618 ट्रेन ट्रिप
दररोज किती ट्रेन ट्रिप प्रवाश्यांच्या सेवेत असतात याबाबत अनिल गलगली यांस कळविले आले की दररोजच्या ट्रेनची माहिती पब्लिक टाइम टेबलमध्ये प्रकाशित केली जाते. सद्या पश्चिम रेल्वेच्या सेवेत 121 रेकस असून 1618 ट्रेन ट्रिप या जनतेच्या सेवेत असतात. विशेष ट्रेनची माहिती सामग्री पातळीवर उपलब्ध नाही. म्हणजे दररोज एका ट्रेनमधून 2383 इतके प्रवाशी प्रवास करतात.
अनिल गलगली यांच्या मते जी आकडेवारी दिली गेली आहे ती सरासरी असून गर्दीच्या वेळी संख्या दुप्पट होते. ट्रेन ट्रिपची संख्या प्रवाश्यांच्या तुलनेत कमी असून ती वाढविण्याची आवश्यकता आहे यामुळे प्रवाशी दुर्घटनेच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ कमी होईल आणि शत प्रतिशत मध्य रेल्वे दुर्घटनामुक्त होईल.