मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्रात 8 लाख कोटींची गुंतवणूक - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्रात 8 लाख कोटींची गुंतवणूक - मुख्यमंत्री

Share This
मेक इन इंडिया सप्ताहाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र शासनाचे 18 सामंजस्य करार
मुंबई http://www.jpnnews.in 
मेक इन इंडिया सप्ताहाच्या पाचव्या दिवशी मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, किरकोळ उद्योग, लघु व मध्यम उद्योग, परवडणारी घरे आदी क्षेत्रातील 18 सामंजस्य करार करण्यात आले. आज झालेले 18 व यापूर्वी केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यात 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. मेक इन इंडिया सेंटरच्या दालन क्रमांक 12 मधील विविध दालनांत हे सामंजस्य करार झाले. मेक इन इंडिया सप्ताहाच्या समारोपाच्या एक दिवस आधी हे सर्व करार झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages