Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

'डेब्रिज ऑन कॉल' सेवेद्वारे २६ हजार मेट्रीक टन 'डेब्रिज' गोळा

६४ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा !
मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
आपल्या सोसायटी मध्ये किंवा घरामध्ये होणारे लहानमोठे दुरुस्तीकाम किंवा बांधकाम यातून मोठ्या प्रमाणात 'डेब्रिज' निर्माण होत असते. `या 'डेब्रिज' चे काय करायचे?' असा प्रश्न संबंधितांना नेहमीच पडत असे. नागरिकांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा विभागाची ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सेवा अव्याहतपणे कार्यरत आहे. या सेवेअंतर्गत संबंधितांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयास दूरध्वनी द्वारे सूचना दिल्यानंतर व संबंधित शुल्क भरल्यानंतर महापालिकेची गाडी येऊन 'डेब्रिज'घेऊन जाते. या सेवेसाठी महापालिकेद्वारे 'डेब्रिज'च्या वजनानुसार अत्यल्प शुल्क आकारले जाते.
ही सेवा सुरु झाल्यापासून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत महापालिकेने सुमारे २६,२४४ मेट्रीक टन डेब्रिज उचलले आहे. विशेष म्हणजे या सशुल्क सेवेच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत सुमारे ६४ लाख ५७ हजार ८१७ रुपयांची भर देखील पडली आहे.‘डेब्रिज ऑन कॉल’ या सेवेद्वारे सर्वाधिक 'डेब्रिज' महापालिकेच्या `एस' विभाग (भांडूप व कांजूरमार्ग परिसर), `के / पश्चिम' विभाग  (अंधेरी, वर्सोवा, जुहू व विलेपार्ले परिसर) व `डी' विभाग (गिरगाव व मलबार हिल परिसर) या तीन विभागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. महापालिकेच्या या तिन्ही विभागातून एकूण ११,१२१ मेट्रीक टन इतके 'डेब्रिज' गोळा करण्यात आले आहे. ज्यामुळे पालिकेला २५ लाख ७८ हजार २६२ रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. 

या सेवेची उपयोगिता आणि सुलभता लक्षात घेता आपल्या घरगुती दुरुस्ती व बांधकामातून निर्माण होणारे 'डेब्रिज' उचलण्यासाठी पालिकेच्या नजिकच्या प्रभाग कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा व ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त(शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील घरगुती स्तरावर बांधकाम दुरुस्ती तसेच बांधकामाच्या निष्कासनातून निर्माण होणा-या 'डेब्रिज' ची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास नागरिकांना त्याचा त्रास होतो. तसेच यामुळे ‘स्वच्छ मुंबई - स्वच्छ भारत’ या संकल्पनेपासून आपली मुंबई दूर आहे की काय? असा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे या'डेब्रिज' ची योग्य प्रकारे व अधिकृतपणे विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या बृहन्मुंबई महापालिकेने सुरु केलेली ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील नुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom