डम्पिंग आगीविषयी चर्चेला नकार दिल्यामुळे कॉंग्रेसकडून महापौरांना कचऱ्याची पिशवी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डम्पिंग आगीविषयी चर्चेला नकार दिल्यामुळे कॉंग्रेसकडून महापौरांना कचऱ्याची पिशवी

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लागलेल्या आगीविषयी महापालिका सभागृहात चर्चा घडवण्याची मागणी गुरुवारी कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली. परंतू चर्चेला महापौर स्नेहल आंबेकर यांनी नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांना कचऱ्याने भरलेली पिशवी भेट दिली. त्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांत जुपून तुंबळ घोषणायुद्ध झाले. या प्रकरणी कॉंग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला; मात्र गटनेत्यांच्या मध्यस्थीमुळे कारवाई टळली. 
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीचा मुद्दा उपस्थित केला. महापौर आंबेकर यांनी या विषयावर चर्चा घेण्यास नकार दिल्यामुळे कॉंग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आमनेसामने येऊन घोषणायुद्ध सुरू केले.

हा गोंधळ अर्धा तास सुरू असताना कॉंग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी कचऱ्याची पिशवी महापौर आंबेकर, उपमहापौर अलका केरकर आणि अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्या आसनांसमोर ठेवली. त्यामुळे गोंधळ वाढला. कॉंग्रेसच्या सदस्यांनी कागदही भिरकावले. शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी जोरदार निषेध केला. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनीही संताप व्यक्त केला. बेशिस्त वर्तन करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. या गोंधळात महापौरांनी कामकाज आटोपते घेतले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages