सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनाधिकृत 'वॉक हाय' हॉटेलवर महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनाधिकृत 'वॉक हाय' हॉटेलवर महापालिकेची कारवाई

Share This
सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
मुंबई http://www.jpnnews.in 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी / दक्षिण विभाग कार्यालय अंतर्गत येणा-या सेनापती बापट मार्ग पदपथावर व 'लोअर परळ' परिसरातील फिनिक्स मॉल समोर असणा-या 'वॉक हाय' या अनाधिकृत हॉटेलवर बृहन्मुंबई महापालिकेद्वारे आज धडक कारवाई करण्यात येऊन हे हॉटेल पूर्णपणे निष्कासित करण्यात आले. सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेच्या जी / दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.  ४० कामगार, संबंधित अधिकारी यांच्या सहकार्याने आणि ४ जेसीबी, ८ डम्पर इत्यादींद्वारे ही कारवाई पूर्ण करण्यात आली. 


महापालिकेच्या जी / दक्षिण विभागात असलेल्या सेनापती बापट मार्ग पदपथावर 'वॉक हाय' हे हॉटेल हे अनाधिकृतपणे गेली काही वर्ष सुरु होते. याबाबत महानगरपालिका अधिनियम ३१४ नुसार नोटीस बजावण्यात आली होती. मात्र संबंधित हॉटेल चालकाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. दिवाणी न्यायालयाने सदर दावा निकाली काढल्यावर संबंधित हॉटेल चालकाद्वारे मा. उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वेाच्च न्यायालयात देखील दावा दाखल करण्यात आला होता.

सर्वेाच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत संबंधित हॉटेल चालकास ४ आठवड्यांच्या कालावधीत स्वत:हून सदर जागा रिकामी करुन देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सदर हॉटेल चालकाने  स्वत:हून सदर जागा रिकामी करुन देण्याचे शपथपत्र मा. सर्वेाच्च न्यायालयास सादर केले होते.  मात्र असे असूनही संबंधित हॉटेल चालकाने सदर हॉटेल चालूच ठेवले होते व हॉटेल रिकामे करण्याबाबत कोणतीही हालचाल केली नव्हती. त्यामुळे सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४ आठवडे पूर्ण होताच आज दि. २० फेब्रुवारी २०१६ रोजी सदर हॉटेल निष्कासित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages