रहिवाशांनी मानवी साखळी करून डम्पिंग अन्यत्र हलवण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2016

रहिवाशांनी मानवी साखळी करून डम्पिंग अन्यत्र हलवण्याची मागणी

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर (क्षेपणभूमी) सतत आगी लागत असल्यामुळे या परिसरात राहणे मुश्‍किल झाले आहे. सोमवारी या परिसरातील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून पहिल्यांदाच हे डम्पिंग हटवण्याची मागणी केली. 

आगीमुळे या परिसरातील दम्याच्या रुग्णांना अन्यत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुले व वृद्धांना प्रचंड त्रास होत आहे. सोमवारी रस्त्यावर मानवी साखळी करून रहिवाशांनी डम्पिंग अन्यत्र हलवण्याची मागणी केली. या आंदोलनात शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या डम्पिंगवर लहान-मोठ्या आगी नेहमीच लागतात. धुरामुळे रहिवाशांना दारे-खिडक्‍या बंद करून झोपावे लागते. मुलांना अभ्यासही करता येत नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

Post Bottom Ad