मुंबई महापालिकेकडून बेस्टला शंभर कोटीचे अनुदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेकडून बेस्टला शंभर कोटीचे अनुदान

Share This
MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016 
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला सोमवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. बेस्टला पालिकेने शंभर कोटींचे अनुदान दिले असून स्थायी समितीच्या बैठकीत तो निधी मंजूर करण्यात आला. सध्या सुरू असलेली फोर्ट फेरी रद्द करून तिच्या जागी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक बस या निधीतून विकत घेतल्या जातील. बेस्टला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. 
आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला मदत करण्याची मागणी बेस्ट समितीत सातत्याने होत आहे. आज स्थायी समितीत पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना बेस्टला शंभर कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले. कुर्ला आगाराचा विकास केला आहे. त्याच धर्तीवर सांताक्रूझ आणि ताडदेव आगारांचाही विकास करता येऊ शकेल. विकसकाने आगाराचे बांधकाम करून दिल्यास त्याला व्यावसायिक वापरासाठी काही जागा मिळू शकते. त्यातून बेस्टला महसूल मिळू शकतो. खासगी पार्किंग, मॉल आदी गोष्टींचा आगारांमध्ये अंतर्भाव केल्यास त्यातूनही पालिकेला मोठा महसूल मिळू शकेल, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली. बेस्ट संकटात असताना अशा पर्यायांचा विचार करण्यास हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

बेस्ट सध्या फोर्ट परिसरात 22 फेरी बस चालवत आहे. त्यातील दहा बस काढून त्यांच्या जागी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक बस खरेदी करण्याच्या विचार आहे. त्या टप्प्या-टप्प्याने वाढविल्या जातील, अशा माहिती त्यांनी दिली. इलेक्‍ट्रॉनिक बसचा खर्च प्रत्येकी सुमारे 90 लाख रुपये आहे. पालिकेने दिलेल्या निधीतून इकोफ्रेंडली बस खरेदी केल्या जातील. त्यात वाढ होईल. बस खरेदीसाठी केंद्राच्या योजनेतून कर्जही मिळू शकेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages