जेएनयू - दोषींवर कारवाई करण्याची आठवलेंची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जेएनयू - दोषींवर कारवाई करण्याची आठवलेंची मागणी

Share This
MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, त्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. जेएनयुतील वादंगाची सखोल चौकशी करावी यासाठी मंगळवारी गृहमंत्नी राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

जेएनयू मध्ये ज्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या ते देशद्रोही असून अशा मंडळींवर कारवाई झालीच पाहिजे. याप्रकरणात अटकेत असणारा विद्यार्थी नेता कन्हैया याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणी दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातील खरा कोणता, याचा शोध घेतला पाहिजे. निर्दोष विद्यार्थ्यांवर कारवाई होवू नये, यासाठी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. (

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages