डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गौरव विशेषांकासाठी दुर्मिळ छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गौरव विशेषांकासाठी दुर्मिळ छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्ष संपूर्ण भारतात साजरे होत असून दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘कॉफी टेबल बुक’ प्रकारातील एक गौरव विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी ज्या व्यक्ति, संस्था, संघटना यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबध आला त्या  संदर्भातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ताक्षराने केलेला पत्रव्यवहार ज्यांच्याकडे असतील त्या व्यक्ति व संघटनांनी या विशेषांकासाठी जनसंपर्क विभाग, रुम नं. २४,तळमजला, न्यू ऍनक्स बिल्डींग, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ येथे आणून द्यावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्ष संपूर्ण भारतात साजरे होत असून शतकोत्तर रौप्य महोत्सव निमित्त महापालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली देता यावी म्हणून मा. उप आयुक्त (सा.प्र.) यांनी दिलेल्या आदेशानुसार शतकोत्तर रौप्य महोत्सवनिमित्त डॉ. आंबेडकरांच्या जीवन पटावरील-नि-विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्यांनी केलेली कार्ये ही महत्त्वपूर्ण असल्याने या सर्वांचा समावेश करुन तसेच या विषयाबाबतच्या छायाचित्रांचा वापर करुन आंतरराष्ट्रीय धर्तीचे ‘कॉफी टेबल बुक’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी उल्लेखीत केलेल्या स्थळी दुर्मिळ तसेच संग्रहीत केलेले छायाचित्रे देऊन पालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करावे  असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages