उपनगरीय रेल्वेच्या परतीच्या तिकीटाचा कालावधी पूर्ववत राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपनगरीय रेल्वेच्या परतीच्या तिकीटाचा कालावधी पूर्ववत राहणार

Share This
रेल्वे प्रवाशांना  दिलासा
मुंबई http://www.jpnnews.in 
मुंबईत उपनगरीय रेल्वेने प्रवाशांना  देण्यात  येणाऱ्या परतीच्या तिकिटाचा कालावधी 6 तासांचा करण्याचे रेल्वेच्या  अधिका-यांनी प्रस्तावित केले होते. हा बदल करण्यात येऊ नये  असे अशी मागणी करीत आज मुंबई भाजपा अध्यक्ष  आमदार अॅड  आशिष शेलार यांनी रेल्वे राज्य  मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा प्रस्तावित  बदल न करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे रेल्वे  प्रवाशांना दिलासा मिळाला आहे

मुंबई  उपनगरीय रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या परतीच्या  तिकिटावर दुसर्‍या दिवशी सकाळ पर्यंत  प्रवास  करण्याची मुभा आहे. तसेच शनिवारी काढलेले परतीचे  तिकीट सोमवारी सकाळ पर्यंत  वैध मानले जाते. मात्र  या मध्ये  बदल करून परतीच्या प्रवासाच्या तिकीटाची वैधता  सहा तासांची करण्याची  सूचना रेल्वे  अधिका-यांनी रेल्वे  बोर्डाला केली होती, अशी वृत्ते गेले काही दिवस विविध  वर्तमानपत्रात प्रसिद्ध  होत आहेत. या बदलाला रेल्वे  प्रवासी संघटना व प्रवाशांनी विरोध केला असून प्रवाशांमध्ये तिव्र नाराजी होती. मुंबईत रोज सुमारे सत्तर  लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करत असून यामध्ये  रोज तिकीट  काढून प्रवास  करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
त्यामुळे या बाबत लक्ष वेधत आज मुंबई  भाजपा अध्यक्ष  आमदार  अॅड  आशिष शेलार यांनी  रेल्वे  राज्य मंत्री मनोज सिन्हा यांची  नवी दिल्ली येथे भेट  घेतली. यावेळी  दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की  अशा प्रकारचा बदलाबाबत रेल्वे  प्रवाशांमध्ये  नाराजी असून तीव्र  असंतोष ही दिसून येत आहे. या बदलामुळे  रेल्वे  प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे  त्यामुळे  हा प्रस्तावित बदल करण्यात  येऊ नये अशी विनंती  आमदार  अॅड  आशिष  शेलार यांनी केली. ती मान्य  करीत रेल्वे राज्य  मंत्र्यांनी मुंबईकरांना दिलासा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages